अवैध दारू विक्री प्रकरणी बार्शी तालुका पोलिसांची कारवाई, दोघांवर गुन्हा

0
389

अवैध दारू विक्री प्रकरणी बार्शी तालुका पोलिसांची कारवाई, दोघांवर गुन्हा

बार्शी :

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

अवैध दारू विक्री प्रकरणी तालुका पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला. बालाजी उर्फ शशिकांत काळे (रा जामगाव आ शिवार टॉवर जवळ ) व शाहू कांतीलाल पवार (रा जामगाव आ ता बार्शी ) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. दि २७ रोजी सायंकाळच्या सुमारास ही कारवाई झाली.

सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांचेसह तालुका पोलिसांचे पथक अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी तालुका हद्दीत गस्त घालत असताना त्यांना जामगाव हद्दीत रेणुका थिएटरच्या पाठीमागे मोकळ्या पटांगणात तसेच दुसरा कुर्डूवाडी बायपास रोडवरील एका चौकजवळ हातभट्टी दारू विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे पोलीस सदर ठिकाणी छापा टाकला असता सदरच्या दोघांजवळ हात भट्टी दारू आढळली. पोलिसांनी दारू जप्त करून दोघांवर गुन्हा दाखल केला.

वाहतूक नियमांचे उल्लंघन, ५६ वाहनचालकांवर कारवाई

तालुका पोलिसांनी मागील दोन दिवसात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५६ वाहन चालकांवर कारवाई करत १२९०० रुपये दंड आकारला. सहायक पोलिस निरीक्षक राहुल देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Best IT Comany In Maharashtra , Solapur