अल्पवयीन मुलीवर अत्याचार ,एकास १० वर्ष सश्रम कारावास; बार्शी कोर्टाचा निकाल
गणेश भोळे
बार्शी: पिडीतेच्या घरात घुसुन पिडीतेवर जबरी संभोग केल्याप्रकरणी आरोपी किरण मसा भोसले (रा उपळाई ठोंगे ता . बार्शी ) यास सदर गुन्ह्यात दोषी धरून विशेष जिल्हा न्यायमुर्ती अ .ब भस्मे यांनी बाल लैंगिक अत्याचार कायदान्वये दहा वर्ष सक्तमजुरी व पंचवीस हजार दंडाची शिक्षा सुनावली आहे .व दंड पंचविस हजार दंड न भरल्यास सहा महीन्याची सक्तमजुरी व पाचशे रु दंड अशी शिक्षा सुनावली आहे. .


याबाबत अधिक माहीती की १ ऑगस्ट २०१७ रोजी आरोपी किरण याने पिडीतेच्या घरात घुसुन पिडीतेवर जबरी संभोग केल्याप्रकरणी वैराग पोलिसात गुन्हा दाखल झाला होता.
याबाबत आरोपी किरण मसा भोसले याचे विरुध्द बाल लैंगिक अत्याचार कायदा २०१२ कलम ४ अन्वये दोषारोपत्र दाखल करून यावर कोर्टासमोर सुनावणी होवुन या दरम्यान सरकारतर्फ एकुण १३ साक्षीदार तपासण्यात आले सदर साक्षीमध्ये पिडीतेची व डॉक्टरांची साक्ष तसेच पिडीतेचे आई सह पिडीतेचा भाऊ व अज्ञान साक्षीदारांच्या साक्ष अत्यंत महत्वाची ठरल्या. तर यावेळी आरोपीच्या बचावासाठी दोन साक्षीदार तपासण्यात आले .

पिढीतेने कश्या पध्दतीने कृत्य केले हे में कोर्टात पुराव्यासह सांगितले तर तपासिक अधिकारी सपोनि खांडेंकर यांची साक्ष गुन्हा शाबीत करण्यासाठी महत्वाची ठरली सरकारतर्फे सरकारी वकील दिनेश देशमुख यांनी युक्तीवाद करताना सदरचे कृत्य दे पिडीतेवर जबरदस्तीने केलेले असुन आरोपीने घेतलेला बचाव व बचावासाठी तपासलेले साक्षीदार यांच्यातील विसंगती व आरोपीविरुद्ध आढळुन आलेला सबळ पुरावा असा युक्तीवादग्राह्य धरून सदर आरोपी किरण मसा भोसले यास शिक्षा सुनावली आहे .सरकारी पक्षातर्फे अॅड दिनेश देशमुख , वैराग पोलिस ठाण्याचे कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोहॅकॉ एस .टी आळणे यांनी काम पाहीले.