अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग , आरोपी अटकेत ;बार्शी तालुक्यातील घटना
बार्शी : तालुक्यातील शेलगाव ( मा) येथे इयत्ता सहावीत शिकणाऱ्या वय १२ वर्षीय मुलीवर शेजारी राहणाऱ्या एका इसमाने त्या मुलीच्या घरात जावून तिच्यावर लज्जा वाटेल असे कृत्य केले म्हणून त्या मुलीच्या आईने आज बार्शी तालुका पोलीस ठाणे येथे तशी फिर्याद दिली असून त्या बाबत बार्शी तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी कि , फिर्यादी पीडीतेची आई , वडील हे मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह भागवत आहेत. फिर्यादी ची मुलगी हि दि. २७ एप्रिल रोजी दुपारी घरी एकटीच होती आणि त्या स्वतहा शेळ्या चारण्यासाठी गेल्या होत्या तेव्हा दुपारी ३.३० च्या दरम्यान त्या पाणी पिण्यासाठी घरी आल्या असत्या त्यांनी घराचे दार बंद आहे आतून कडी लावली असल्याचे आढळले.

तेव्हा त्यांनी दरवाजा वाजवल्या नंतर आतून त्यांच्या शेजारी राहणारा राहुल मारुती इंगळे हा इसम बाहेर आला. तेंव्हा फिर्यादी पाणी पिऊन वापस गेल्या व नंतर ५. चे दरम्यान घरी आल्यावर आपल्या मुलीस विचारले असता तिने सांगितले कि, राहुल इंगळे यांनी घरात येवून दरवाजा बंद करून माझ्या अंगावर बसून लज्जा वाटेल असे कृत्य केले.
या बाबत आज बार्शी पोलीस ठाणे येथे तशी फिर्याद दाखल झाली असून बार्शी तालुका पोलीस यांनी भा. द. वी ३५४ प्रमाणे बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधात्मक कायदा , पोस्को प्रमाणे गुन्हा दाखल केला असून आरोपी राहुल इंगळे यास अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक शेख हे करत आहेत.