अभिनेता पवन कल्याण याची विनंती आणि त्याला उद्धव ठाकरेंच अभिमानास्पद उत्तर

0
372

देशात निर्माण झालेल्या कोरोना व्हायरसमुळे देश लॉक डाऊन केला आहे यामुळे हातावर पोट असलेल्या नागरिकांचे हाल होत आहेत. अशा स्थलांतरितांचे हाल होऊ नयेत यासाठी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दक्ष आहेत. बंगाल मधील 800 कामगाराची त्यांनी तात्काळ सोय केली. अशाच प्रकारे आंध्रप्रदेश मधील 500 कामगार मुंबईत अडकले आहेत. त्यांच्या खाण्या पिण्याची सोय करावी असे पत्र जनसेना पार्टीचे प्रमुख अभिनेते पवन कल्याण यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे करताच त्याची मुख्यमंत्र्यांनी तात्काळ दखल घेतली.

पवन कल्याण यांना ट्विट करून पवनजी तुम्ही काळजी करू नका.या संकटाच्या काळात अडचणीत असलेल्या सर्वांची मदत करणे ही आपली जबाबदारी आहे.त्यांच्याशी संपर्क करून मदत पोहच केली जाईल असे म्हटले आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

पवन कल्याण यांचे पत्र जसेच्या तसे

श्री उद्धव ठाकरे जी!

महाराष्ट्रातील लॉकडाऊनच्या घटनेनंतर मुंबईच्या हद्दीत गोमाहल्ली (पश्चिम) येथे आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यातील अलूरु, अडोनी, मंत्रालयम आणि येम्मीनागनुर विधानसभा मतदारसंघातील रोजंदारीवरील काम करणाऱ्या 500 पेक्षा जास्त कुटुंब अडकले आहेत . खुप कठिण परिस्थित अडकलेले या तेलगू लोकांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो आहे, त्यांना योग्य अन्न, पिण्याचे पाणी आणि
इतर कुठली ही मूलभूत गरजे ची व्यवस्था नहीं आहे ! त्यांच्या व्यवस्थापनाने त्यांना, केलेल्या कामाची मजूरी पण देण्यास नकार दिला आहे !

जेवणानांची काही ही सोय कारण्यासाठी त्यांना त्यांच्या तंबूबाहेर ही जाऊ दिले जात नसल्यामुळे त्यांची दयनीय परिस्थिती माघे आड़ पुढे विहिर सारखी झाली आहे! लहान बाळांना आपल्या तळहातावर धरुन अनेक माता आपल्या मुलांना पोसण्यासाठी दुधाच्या एका ग्लासासाठी तळमळत आहेत ! त्यांना, सामाजिक अंतर न ठेवल्याने CORONA VIRUS च्या दुष्परिणामांविषयी काही ही माहिती नसल्यामुळे हे रोजंदारीचे कामगार आणि त्यांचे कुटुंब मदत शोधायला गटां गटांमध्ये एकत्र येत आहेत.

महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे जी यांना मी कळकळीची विनंती करतो की आंध्र देशातील परप्रांतीय रोजंदारी कामगारांची सुटका करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत आणि त्यांना आवश्यक आणि योग्य ती मदत करावी ! या पेचप्रसंगत , संकटाच्या काळात दारिद्रय रेषेखालील ह्या लोकांची काळजी घेण्याच्या केंद्र सरकारच्या निर्देशांचे पालन करण्याची जवाबदारी आपल्यावर आहे
आणि आपण ते योग्यरीति पाळ पाळणार अशी माझी अपेक्षा आहे !

मी आंध्र प्रदेश सरकारलाही विनंती करतो कि आंध्र प्रदेश राज्यातील उत्कंठित, उपासमार कामगारांना मदत करण्यासाठी पावले उचलावीत आणि महाराष्ट्र सरकारशी चर्चा करावी ! कुरनूलच्या जिल्हाधिकायांना याचासाठी युद्धपातळीवर कार्य करावे लागेल आणि या
अडकलेल्या कामगारांना त्वरित मदत मिळावी हे पाहावे लागेल!

मुख्यमंत्री श्री जगन रेड्डी यांनी यावर उपाय शोधण्यासाठी जिल्हा यंत्रणेला निर्देश दिलेच पाहिजेत. श्री विनोद यांच्याकडे 500 तेलगू कुटुंबांची माहिती उपलब्ध आहे (MOBILE NO. 7780273253).

Best IT Comany In Maharashtra , Solapur