अबब…शिरपूर तालुक्यात तब्बल दोन कोटींचा गांजा पकडला

0
357

शिरपूर : तालुक्यातील लाकड्या हनुमान गावाच्या शिवारात मांंगिलाल बारकु पावरा याच्या शेतात तब्बल २ कोटी १५ लाख ७२ हजार रुपयांचा गांजाचा साठा पोलिसांनी पकडला.मंगळवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास पोलिसांनी गांजाच्या अड्यावर छापा मारला त्यानंतर रात्री उशिरापर्यंत मुद्देमालाचे मोजमाप सुरु होते.

पोलिसांनी छापा मारलल्यानंतर मांगीलाल बारकु पावरा रा.लाकड्या हनुुमान हा संशयित फरार झाला आहे. त्यांच्याविरुध्द शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहेे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा


घटनास्थळी पोलिसांनी छापा मारला त्यावेळी हिरवंट रंगाची पाने,बिया व काड्यांचा चुरा असलेला गांजा सदशय अंमली पदार्थ वेगवेगळ्या प्लॉस्टिकच्या गोण्यांमध्ये भरलेला होता.

वजनकाटा धारक राजाराम वंंजारी याच्याकडून मोजूून अंदाजे ३०किलो वजनाच्या १२८ गोण्या भरुन ठेवल्याचे निदर्शनाला आले गांजाच्य साठ्याचे एकुण वजन ३ हजार ९०४ किलो आहे. सदरचा गांजा ५ हजार ५०० रुपये किलो दराने विकला जातो असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या साठ्यातुन प्रत्येकी १०० ग्रॅम वजनाचे तीन नमुने पोलिसांनी घेतले असून ते तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

हा संपूर्ण साठा पोलिसांनी जप्त केला आहे. शिवाय घटनास्थळी २५ हजार रुपये किंमतीची मोटारसायकल आणि लोखंडी तगारिंंना साखळी लावून तयार केलेला ३ हजार रुपये किंमतीचा वजन काटा देखील जप्त करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक चिन्मय पंडीत, अपर पोलिस अधीक्षक राजु भुजबळ, स्थानिक गुुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत, शिरपूर तालुका पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अभिषेक पाटील आदींनी घटनास्थळी भेट देवून पहाणी केली.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here