अनलॉक-2: मुंबई महापालिकेची सुधारित नियमावली जाहीर…वाचा सविस्तर-

0
432

लॉकडाउनमुळे ठप्प झालेली मुंबईनगरी लॉकडाउनच्या पाचव्या टप्प्यात हळूहळू पूर्वपदावर येत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या सुचनेनंतर अनेक अटी शिथिल करण्यात आल्या आहे. मुंबईतील लॉकडाउनबाबत पालिकेकडून आणखी अटी शिथिल करण्यात आल्या आहेत.

मिशन बिगेन अगेन म्हणत राज्य सरकारने लॉकडाउनमधून बाहेर पडण्यासाठी 2 जून रोजी नियामवली प्रसिद्ध केली होती. याच नियमावलीनुसार मुंबई महापालिकेकडून सुधारीत परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. या सुधारीत पत्रकानुसार, मुंबईतील दुकानं उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु, एका दिवसात एकाच लेनची दुकानं उघडता येणार आहे. सोमवार ते शनिवारपर्यंत दुकानं उघडता येतील, रविवारी दुकानं बंद ठेवावी लागणार आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

खेळाच्या मैदानांवरील झुला किवा इतर खेळाच्या साहित्याचा वापर करता येणार नाही, ओपन एअर जिमच्या साहित्याचा वापरावर निर्बंध.

दुकानं उघडली जातील, पण रस्त्याच्या एका बाजूची दुकान उघडी ठेवली तर दुसऱ्या बाजूकडील दुकानं बंद ठेवली जावी.

दुकाने पूर्णवेळ(साधारणपणे जितका वेळ असतात) उघडी राहतील.

दुकाने सोमवार ते शनिवार उघडी राहणार तर रविवारी बंद राहतील.

वृत्तपत्रांची घरी डिलिव्हरी करण्यासाठी मुभा, पण मास्क आणि इतर सुरक्षेच्या उपाययोजनांच पालन करावे लागेल.

शैक्षणिक संस्था जसे कॉलेज, विद्यापीठ, शाळामधील कर्मचारी वर्ग आणि शिक्षकांना कामावर जाता येईल पण शिकवण्याच्या कामाव्यरिक्त इतर कामांसाठी.

Best IT Comany In Maharashtra , Solapur