अनं ‘त्या’ शेतकऱ्यांना धनंजय मुंडेंनी दिला दिलासा

0
273

अनं ‘त्या’ शेतकऱ्यांना धनंजय मुंडेंनी दिला दिलासा

आणलेला भाजीपाला पुन्हा घेतला विकत; शहरात मोफत वाटपास सुरुवात

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

परळी- जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशित केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना/व्यापाऱ्यांना आता भाजीपाला गल्लोगल्ली जाऊन विकावा लागत आहे, परंतु परळी व परिसरातील जास्त भाजीपाला असणारे शेतकरी, वयोवृद्ध शेतकरी व व्यापाऱ्यांना याची अडचण होत होती, अशा जवळपास १०० शेतकऱ्यांनी पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या जगमित्र कार्यालयाकडे आज सकाळी धाव घेतली. धनंजय मुंडे यांनी तात्काळ या सर्व शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला आहे.

ना. मुंडेंनी आज पुन्हा एकदा आलेला सर्व अंदाजे दीड लाख रुपये किमतीचा भाजीपाला त्यांच्या ‘नाथ प्रतिष्ठान’ या सामाजिक संस्थेमार्फत विकत घेतला असून तो नगरसेवक व पदाधिकाऱ्यांकरवी शहरातील गरजू नागरिकांना मोफत वाटप केला जात आहे.

काही शेतकऱ्यांचे भाजीपाला उत्पादन जास्त प्रमाणावर आहे, अशा शेतकऱ्यांना दररोज तो शहरात आणून गल्लोगल्ली फिरून विकणे शक्य होत नाही, तसेच काही शेतकरी/व्यापारी वयोवृद्ध असल्यामुळे त्यांनाही फिरून विकण्याची अडचण होते, शिवाय बऱ्याच जणांना विकण्यासाठी वाहनांची अडचणही आहे. अशा सर्व शेतकऱ्यांनी ना. मुंडे यांच्या जगमित्र कार्यालयाकडे धाव घेत आपली कैफियत मांडली.

काही शेतकऱ्यांनी भाजीपाला रस्त्याच्या कडेला बसून विकण्याबाबत परवानगी मागितली आहे तर काहींनी भाजीपाला ठोक विक्रीचे बीट सुरू करण्याची मागणी केली. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून दोन दिवसात निर्णय घेऊ असेही ना. मुंडे यांनी उपस्थित सर्व शेतकऱ्यांना यावेळी सांगितले.

दरम्यान शेतकऱ्यांनी आज आणलेला भाजीपाला वाया जाऊ नये म्हणून ना. धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा त्यांच्या ‘नाथ प्रतिष्ठान’ तर्फे अंदाजे दीड लाख रुपये किमतीचा भाजीपाला विकत घेतला असून गरजू नागरिकांना मोफत वाटप करण्यास सुरुवातही करण्यात आली आहे.

सबंध जिल्ह्यासाठी भाजीपाला विक्रीसाठी घालून दिलेले नियम व शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून दोन दिवसांच्या आत निर्णय घेऊ, कोणत्याही स्वरूपात शेतकऱ्यांच्या शेतमालाचे नुकसान होऊ देणार नाही, असे आश्वासन यावेळी ना. मुंडे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिले.

यावेळी नगर परिषद गटनेते वाल्मिक अण्णा कराड, माजी नगराध्यक्ष दीपक नाना देशमुख, अय्युबखान पठाण, भाऊड्या कराड यांसह स्थानिक अधिकारी, शेतकरी व व्यापारी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांच्या बैठकीसह ना. मुंडे यांनी सोशल डिस्टन्सिंग पाळण्याबाबत विशेष खबरदारी घेतल्याचेही दिसून आले.

Best IT Comany In Maharashtra , Solapur