अत्यावश्यक सेवेत रुजू असणारी बेस्ट आजपासून संपावर
सुरज गायकवाड
ग्लोबल न्यूज: कोरोनाच्या वाढत्या प्रधुर्भावामुळे तसेच आर्थिक संकटात कार्यरत असणाऱ्या बेस्ट कर्मचाऱ्यांनी बेमुदत बंद पुकारला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन बेस्ट कर्मचाऱ्यांना कोणातीच उपाययोजना करत नसल्याने काही कर्मचारी आज कोरोनाबाधित झाले आहेत. प्रशासन बेस्ट कर्मचाऱ्यांकडे लक्ष देत नसल्याने बेस्ट कर्मचाऱ्यांनी आज बंद पुकारला आहे.


याबाबतची माहिती दोनच दिवसांपूर्वी बेस्ट संघटनेचे अध्यख शशांक राव यांनी माध्यमांना दिली होती. या कर्मचाऱ्यांना कामावर हजर असताना मास्क सॅनिटायझर किंवा इतर सुरक्षात्मक साधनं पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून दिलेली नाहीत. त्यामुळे आपण संपाच्या निर्णयापर्यंत पोहोचलो आहे.
बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बंदामुळे आरोग्य व्यवस्था आणि इतर जीवनावश्यक बाबींवर परिणाम होण्याचा अंदाज आहे. तर त्यासाठी सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून राज्यभरातून तब्बल 1000 बसेस मुंबईत मागविण्यात आल्या. अत्यावश्यक सेवेसाठी बेस्ट सुमारे 3260 कामगार काम करत आहेत.
