अडकलेल्या नागरिकांना आपापल्या घरी जाता येणार, पण या आहेत अटी आणि नियम;केंद्र सरकारने काढला मार्ग

0
257

मुंबई | केंद्रीय गृहमंत्रालयाने बुधवारी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलाय.. देशभरात वेगवेगळ्या राज्यांत अडकलेल्या स्थलांतरित कामगार, पर्यटक आणि विद्यार्थ्यांना आपापल्या घरी जाता येणारे. मात्र यासाठी काही नियम आणि अटी ठेवण्यात आल्यात.

लॉकडाऊनमुळे देशातील अनेक राज्यात लाखो कामगार अडकून पडलेत. याचबरोबर विविध राज्यात शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांनाही स्वगृही परतणे शक्य होत नव्हते. या अडकलेल्या मजुर आणि विद्यार्थ्यांसाठी मोदी सरकारने मोठा निर्णय घेतलाय. आता एका राज्यातून दुसऱ्या राज्यांमध्ये मजुरांसह विद्यार्थी आणि पर्यटकांना जाता येणारे. मात्र या कामगारांना घेऊन जाण्याची व्यवस्था त्या त्या राज्यांनी करायची आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने एक आदेश काढलाय.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

आदेशात काय म्हटले आहे ?

१) सर्व राज्यांनी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी.
राज्यात अडकलेल्या लोकांची यादी नोडल अधिकाऱ्यांनी तयार करावी.

२) एखाद्या समुहाला आंतरराज्य प्रवास करायचा असेल तर दोन्ही राज्यांनी एकमेकांशी संपर्क साधावा.

३) प्रवास करणाऱ्या व्यक्तीची कोरोना तपासणी करावी.
ज्यांच्यामध्ये लक्षण नाहीत त्यांनाच प्रवासाची परवानगी दिली जावी.

४) प्रवासासाठी बसचा वापर केला जावा.
या बसेसचे निर्जुंतीकरण करणे तसेच बसमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक असेल.

५) इच्छित स्थळी पोहोचल्यानंतर संबंधित लोकांची आरोग्य कर्मचाऱ्यांनी तपासणी करावी.
तसेच त्यांना होम क्वॉरन्टाइन आणि गरजेनूसार संस्थात्मक क्वॉरन्टाइन करावे.

लॉकडाउनमुळं अनेक लोक आपल्या घरापासून दूर इतर राज्यांत अडकलेत. यामध्ये स्थलांतरित कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या अडकलेल्या हजारो मजुरांनी तर आपल्या घरी पोहोचण्यासाठी चालत जाण्याचा मार्ग निवडलाय. यामुळं अनेकांचा मृत्यू झाल्याची घटनाही समोर आल्यात. अनेक राज्यांनी कामगारांसह इतरांना आपल्या घरी पोहोचण्यासाठी ट्रेन सुरू कराव्यात अशी मागणी केलीय. त्यातच आता केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक कामगार, विद्यार्थ्यांना दिलासा मिळालाय.

Best IT Comany In Maharashtra , Solapur