अखेर MPSC नं जाहीर केलं नवं वेळापत्रक; ‘या’ तारखांना होणार परीक्षा
मुंबई : अनेक दिवसांपासून स्पर्धा परीक्षार्थी हे परीक्षा कधी होणार ह्या चिंतेमध्ये होते. मात्र आज अखेर आयोगाने परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. ह्या परीक्षांमध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा, संयुक्त पूर्व व अभियांत्रिकी परीक्षा असणार आहे.


आयोगाने राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० ही परीक्षा १३ सप्टेंबर २०२० रोजी घेण्याचे ठरविले आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२० ही परीक्षा ११ ऑक्टोबर २०२० रोजी होणार आहे.
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२० देखील १ नोव्हेंबर २०२० रोजी होणार आहे. एमपीएससी स्टुडंट्स राईट्स, एमपीएससी समन्वय समिती यांच्यासह राज्यभरातील उमेदवारांकडून परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्याची मागणी जोर धरत होती. तसेच मागणीचा पाठपुरावा करण्यात येत होता.