अकलूज,अक्कलकोट,बोरामणी,पंढरपूरातही कोरोनाचे रूग्ण;आज तब्बल 43 रुग्ण पॉझिटिव्ह

0
261

अकलूज,अक्कलकोट,बोरामणी,पंढरपूरातही कोरोनाचे रूग्ण;आज तब्बल 43 रुग्ण पॉझिटिव्ह

सोलापूर- आज रात्री 9 वाजता सोलापूरातील कोरोनाची ताजी स्थिती प्रशासनानं प्रसिध्द केली आहे. यानुसार आज 43 नवे पॉझिटिव्ह रूग्ण सोलापूरात आढळून आले आहेत. एकूण पॉझिटिव्ह संख्या 667 असून 311 जण बरे झाले आहेत तर मृतांची संख्या 66 इतकी आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

एकूण 6698 जणांची आत्तापर्यंत कोरोना चाचणी झाली असून त्यापैकी 6160 अहवाल प्राप्त झाले तर 538 प्रलंबित आहेत. एकूण 5493 निगेटिव्ह अहवाल आहेत तर 667 इतके पॉझिटिव्ह अहवाल आहेत.

आजच्या दिवसात 270 अहवाल प्राप्त झाले आहेत .यापैकी 227 निगेटिव्ह तर 43 पॉझिटिव्ह अहवाल आहेत. यात 24 पुरूष 19 महिलांचा समावेश आहे. आज मृतांची संख्या 3 असून एकूण मृतांची संख्या 66 इतकी आहे. आत्तापर्यंत केगांव येथून 110 जणांना सोडण्यात आलंय तर हॉस्पिटलमधून 311 जण बरे होवून घरी परतले आहेत.

आज ज्या व्यक्ती मृत पावल्या त्यात दक्षिण सदर बझार 60 वर्षीय महिला. भवानी पेठ 75 वर्षीय पुरूष. महेश नगर जुना विडी घरकूल परिसर 64 वर्षीय पुरूष.

आज जे रूग्ण मिळाले त्यांचे विभागपुढील प्रमाणे – अशोेक चौक 1 पुरूष, 3 महिला. दत्तनगर पाच्छा पेठ 1 पुरूष, 3 महिला. मिलिंदनगर बुधवार पेठ 3 पुरूष. प्रियदर्शिनी सोसायटी 1 महिला. उत्तर कसबा 1 पुरूष. बोरामणी 1 पुरूष. सोलापूर जिल्हा कारागृह 1 पुरूष. कुमठा नाका 1 पुरूष. अवंतीनगर 1 पुरूष. कविता नगर पोलीस लाईन 1 पुरूष. नई जिंदगी 1 महिला. जुना विडी घरकुल 1 पुरूष, 3 महिला.

विडी घरकुल 4 पुरूष. मराठावस्ती भवानी पेठ 1 पुरूष. पाच्छा पेठ 1 पुरूष. माधवनगर 1 पुरूष. गीता नगर न्यू पाच्छा पेठ 1 महिला. शिवपार्वतीनगर 1 पुरूष. न्यू बुधवार पेठ 1 महिला. कुमारस्वामीनगर शेळगी 1 महिला. अकलूज ता. माळशिरस 2 महिला. उपरी ता. पंढरपूर 1 महिला. गोपाळपूर पंढरपूर 1 महिला. ज्ञानेश्वरनगर पंढरपूर 1 पुरूष, 1 महिला. करकंभ ता. पंढरपूर 1 पुरूष. मधला मारूती अक्कलकोट 1 पुरूष. भारतगल्ली अक्कलकोट 1 पुरूष.

Best IT Comany In Maharashtra , Solapur